वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुलांना बॉर्नविटा देताय,थांबा! हे वाचा.
काय आहे बोर्नविटा?:
बॉर्नविटा हे एका चॉकलेट व melted चॉकलेट्स ड्रिंक बनवणारी कंपनीचे प्रॉडक्ट आहे.मॉडलेज़् इंटरनॅशनल या कंपनीची सबसिडीयरि कंपनी कॅडबरी ने चॉकलेटचे उत्पादन ज्या गावात सुरु केले होते त्याचे नाव होते बॉर्न व्हिलेज.या गावच्या नावावरून त्याचे ब्रँड नेम हे बोर्नविटा असे ठेवण्यात आले.बर्नविटा चे उत्पादन इंग्लंडमध्ये सन 1920 मध्ये सुरू करण्यात आले.आणि बाजारामध्ये हेल्थ फूड म्हणून विकले जाऊ लागले. इंग्लंड बाहेर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये सन 1933 मध्ये याची विक्री केली गेली.भारतामध्ये सण 1948 मध्ये याचे विक्रीला सुरुवात झाली.आजघडीला बोर्नविटा भारतातील घराघरात पोचलेलेले उत्पादन असून लहान मुलांचे व पालकांचे आवडते हेल्थ ड्रिंक म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते. बोर्नव्हिटामध्ये मुख्यत्वे मॉल्ट एक्सट्रॅक्ट 44%,साखर,कोको दूध,लिक्विड ग्लुकोज,इमलसीफायर,विटामिन रिजेन्ट व रंग याचा समावेश होतो.
असे आहे प्रकरण: एक एप्रिल 2023 रोजी रेवंत हिमतसिंका या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने एक मिनिटाचा व्हिडिओ बनवला होता.त्या व्हिडिओमध्ये त्याने बॉर्नविटा बद्दल खुलासा केला की बॉर्नविटा ने आपल्या पाकिटांवर सेवनाचे फायदे लिहिले आहेत.
1. Immune system-प्रतिकार शक्ती
2.Strong bones-मजबूत हाडे
3.Strong muscles-मजबूत स्नायू
4.Active brain -चौकस मेंदू
मात्र ही प्रतिकार शक्ती (immunity)वगैरे त्यांनी covid नंतर लिहिली त्या पूर्वी असे लिहिले नव्हते.तसेच रेवन्त यांनी पुढे सांगितले आहे की बॉर्नविटा मध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त आहे.त्यामुळे यांचे सेवन करणाऱ्यांना मधुमेह(diabetis) होण्याचा धोका आहे.यात चॉकलेट व साखरे शिवाय कांहीही नाही .व्हिडिओ मध्ये ते पुढे सांगतात की याची टॅग लाईन "तय्यारी जीत की" ऐवजी "तय्यारी डायबेटीस की" अशी असायला हवी.बॉर्नविटा किंवा कॅडबरी ही हेल्थ फूड,हेल्थ सप्लीमेंट बनवणारी कंपनी नाही तर ती चॉकलेट बनवते. त्यामुळे हेल्थ ड्रिंक बद्दलचा दावा ती करू शकत नाही.यात जो कॅरेमल रंग वापरला जातो तो कॅन्सऱ कारक आहे . तसेच यावर कंपनीच्या मायदेशात (इंग्लंड) विक्री व सेवन करण्यावर बंदी का आहे .या बाबतीत सरकारने कांहीतरी करायला हवे अशी हाक ही त्यांनी दिली.
रेवन्त यांच्या या व्हिडिओला खूप.प्रसिद्धी मिळाली.त्त्याचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की अनेक मोठ्या हस्तींनी त्याचा व्हिडिओ like आणी share केला.सोशल मीडिया वर धुमाकूळ घातलेला हा व्हिडिओ बॉर्नविटाच्या व्यवस्थापक मंडळी पर्यंत पोचला.आणी.त्यांनी ताबडतोब हरकत घेत रेवंत यांना मोठ्या लिगल फर्म कडून नोटीस पाठवली.ही नोटीस मिळाल्या नंतर रेवन्त यांनी घाबरून कंपनी ची माफी मागत हा व्हिडिओ डिलिट केला.मात्र प्रकरण इथेच संपले नाही. रेवन्त यांनी व्हिडिओ डीलीट केला पण त्या आधीच खूप व्हायरल झाला आणि सर्व सोशल मिडीया युजर्सनी बॉर्नविटा ला ट्रोल करायला सुरुवात केली.अनेकांनी कंपनीचे कान उपटले.फसवी जाहिरात केल्याचा आरोप केला गेला.कांहींनी सरकारच्या धोरणावर टीका करत यावर कार्यवाही करण्याची मागणी केली.ज्या देशात हे उत्पादन बनवले जाते तिथेच त्यावर बंदी घालण्यात आली. मग आपल्या देशात कसे विकले जाते आहे असा सवाल देखील विचारला जात आहे.
बोर्नविटाचेे स्पष्टीकरण:भारतामध्ये बोर्नव्हिटाला trollers कडून निशाण्यावर घेतले गेल्याने कंपनी खडबडून जागी झाली स्वतः स्पष्टीकरण प्रसिद्ध केले.त्यात ते सांगतात की,'आम्ही गेली 7 दशके ग्राहकांच्या प्रेम आणी विश्वासाला पात्र ठरलो आहोत.आमच्या उत्पादनात विटामिन ए,सी,डी सोबतच आयरन, सिलेनियम, झिंक, व कॉपर ही सप्लीमेंट्स आहेत.कोविड पूर्वीही हे होते.आम्ही 200 एमएल गरम अथवा थंड दुधामध्ये 7.5 ग्राम बोर्नव्हिटा घेण्याची शिफारस करतो. ज्यात जवळपास दीड चमचा साखर असू शकते.हे प्रमाण मुलांसाठी शिफारस केलेल्या साखरेच्या प्रमाणापेक्षा खूप कमी आहे.
तज्ञांचे मत:हा वाद उत्पन्न झाल्यापासून बऱ्याच आहार तज्ञ देखिल सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.एका तज्ञाने सांगितले की एक प्रौढ व्यक्ती एका दिवसाला.7.5 चमचे साखर खाऊ शकते .यामध्ये फक्त साखरच नव्हे तर रोजचे अन्न, साखरे पासून बनलेल्या पदार्थ ,मिठाई इत्यादीचाही समावेश होतो.यापेक्षा जास्त साखरेचे सेवन आरोग्यास अपायकारक ठरु शकते.मुंबई मधील एक आहार तज्ञ सांगतात की दोन वर्षांपेक्षा लहान बालकांना कुठल्याही प्रकारे थोडीदेखील साखर देण्यात येऊ नये. तर 6-18 वयोगटातील बालकांना प्रतिदिन सहा चमचे पेक्षा जास्त साखर देण्यात नये .
जागतिक आरोग्य संघटने च्या मते पौढ व मुले यांच्या एकूण अन्ना मध्ये साखरे चे प्रमाण ही केवळ 10 टक्के असावे .
या वादात आणखी एक ट्विस्ट आला आहे.एन.सी.पी.सी.आर. म्हणजेच राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने त्यांना मिळालेल्या एका तक्रारीवरून बोर्नविटा ला नोटीस बजावली आहे.ज्या द्वारे कंपनीला आपल्या उत्पादनावरून भ्रामक पॅकेजिंग हटवण्यास सांगितले आहे.यासाठी त्यांना सात दिवसाचा अवधी देण्यात आला आहे.
तर अशा प्रकारे बोर्नविटा वरून चर्चांना व वाद-विवादांना उधाण आलेले आहे.या यानिमित्ताने मात्र अशा प्रकारच्या जाहिराती करणारे आणखीन काही उत्पादने बाजारात खुलेआम विना रोकटोक विकली जात आहेत .त्यांच्याबद्दलही विचार होणे आवश्यक आहे.अशी कितीतरी उत्पादने बाजारात मिळतील जी भ्रामक जाहिरात करतात,एवढेच काय तर मोठमोठे सेलिब्रिटी अशा जाहिरातीमध्ये काम करताना दिसतात.आरोग्याला अपायकारक अशा कितीतरी उत्पादनाने बाजार सजलेला आहे.याबाबत काहीतरी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.सरकारने आपले स्तरावर अशा उत्पादनांवर वस्तूंवर त्यांच्या निर्मितीपासून ते मार्केटिंग पर्यंत च्या व पॅकेजिंग पासून ते जाहिरातीपर्यंतच्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणारा कायदा अंमलात आणला पाहिजे.देशातील खाद्यपदार्थ व तत्सम वस्तूंच्या बाबतीत कठोर व काटेकोर नियमावलीचीी आवश्यकता आहे जसे अमेरिकेत इयत्ता पाचवी पर्यन्त च्या मुलाना टोमॅटो केचप खाणे व सोबत बाळगने वर बंदी आहे . इथे एक प्रश्न मात्र मला विचारावासा वाटतो की केवळ सरकार किंवा यंत्रणा यांच्यावर जबाबदारी टाकून आपण मुक्त होऊ शकतो का? तर नाही. कारण आपण जी वस्तू विकत घेतो,सेवन करतो,किंवा वापरतो अशा वस्तू बाबत आपण जागरूकपणे चौकशी करून,वस्तूच्या पॅकेजिंग व आकर्षक रंगरंगोटी वर भाळून न जाता त्यात नेमके कंटेंट (ingrediants )काय आहेत? वस्तूची उत्पादनाची तारीख काय? तसेच त्याची वापरअंतिम (expiry date ) तारीख काय? याबाबत चौकशी नक्कीच केली पाहिजे.याकरिता ग्राहकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे.कारण आरोग्य आपले आहे सरकारचे किंवा कंपन्याचे नाही हे लक्षात असू द्या. धन्यवाद!.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
खतांचा हा नवीन प्रकार आपण पाहिलात का?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
खतं होणार स्वस्त ; रासायनिक खतांवर अनुदान जाहीर .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा