बालमजुरी;एक अभिशाप
बालमजुरी ;जगाला लागलेला एक अभिशाप आहे. आपण आज कितीही प्रगती केली असली ,आपण चंद्रावर पोचलो असलो आणि लवकरच मंगळावर ही आपली पाऊले पडतील . पण आजही आपण पोटाच्या खळगी भरण्यासाठी राबराब राबणाऱ्या चीमुकल्याना त्यांच्या हक्काच मोफत अन्न ,वस्त्र ,आणि निवारा देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. बालमजुरी ही कुणा एका देशाची समस्या नाही तर ही संपूर्ण जगाची व्यथा आहे. जगातील प्रगत राष्ट्रांपासून ते गरीब देशांमध्येही ही समस्या गंभीर बनली आहे.
बाल मजुरी म्हणजे काय :- बालमजुरी म्हणजे लहान बालकांना त्यांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेऊन त्यांना कामाला लावणे व .त्यांच्या वेतनाच्या मोबदल्यात शारीरिक व मानसिक क्षमतेपेक्षा जास्तीची श्रमाची कामे करायला लावणे.
कायद्यानुसार वयाच्या 14 वर्षे पेक्षा लहान बालकांना कोणत्याही प्रकारचे श्रम व कामे करण्यास भाग पाडणे म्हणजे बालमजुरी होय.
बालमजुरीची कारणे:-
बालमजुरीसाठी सर्वात मोठे कारण म्हणजेे गरिबी होय.गरिबीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कुटुंबप्रमुख व सदस्यांना जड जात असते उपलब्ध साधने अपुरी पडतात त्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी बालकांना मजुरी करण्यास लावले जाते.
कुटुंबातील अज्ञान किंवा निरक्षरता हे बालमजुरीसाठी दुसरे मोठे कारण आहे.ज्या कुटुंबामध्ये निरक्षर पालक असतात त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहित नसते त्यामुळे मुलं जितकी लवकर कमवायला लागतील तेवढे चांगले असे त्यांचे मत असते.त्यामुळे बालकांना कमी वयातच मजुरीसाठी पाठवले जाते.
समाजातील काही स्वार्थी आणि पिळवणूक करणाऱ्या लोकांना बालमजूर म्हणजे एक स्वस्त पर्याय वाटतो.कारण बालमजुरांना कमी मोबदला देऊन जास्त कामे करून घेता येतात.हीच कामे प्रौढ मजुरांकडून करून घेण्यासाठी त्यांना जास्त खर्च येतो त्यामुळे ते बालमजुरांना प्राधान्य देतात.
काही लोकांना स्वतःच्या शेतामध्ये तसेच इतरांच्या शेतामध्ये काम करणे म्हणजे बालमजुरी नाही असे वाटत असते.
शिक्षणाच्या सोयीचा अभाव हे देखील एक प्रमुख कारण आहे.रहात असलेल्या ठिकाणी शिक्षणाची सोय नसेल तर किंवा अपुऱ्या सोयी असतील तर पालक मुलांना शिक्षणासाठी इतरत्र ठेवण्यास असमर्थ असतात.किंवा त्यांची मुलांना दूर ठेवण्याची तयारी नसते त्यामुळे अशी मुले बालमजुरी कडे वळतात.
बालमजुरीसाठी कारणीभूतत असणाऱ्या अनेक कारणांपैकी आणखी एक प्रमुख कारण म्हणजे भ्रष्टाचार होय.कित्येक कारखानदार ,उद्योजक व समाजातील लोकांना बाल मजुरी हे अवैध व बेकायदेशीर कृत्य असल्याची माहिती असते परंतु पकडले गेल्यास पैसे अथवा अन्य प्रलोभने देऊन आपली सुटका होऊ शकते हे त्यांना माहीत असल्याने ते बालमजुर कामाला ठेवतात.
बालमजुरी थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न :-
बालमजुरी थांबवण्यासाठी सरकारने आपल्या विविध विभागांतर्गत विशेष प्रयत्न केले आहेत व करत आहेत.
बालमजुरी रोखण्याकरिता घटनेमध्ये तरतूद करण्यात आली असून त्यासाठी 14 वर्षांपर्यंतच्या बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा त्यांचा हक्क असल्याचे नमूद करण्यात आले आहे.त्यानुसार 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येते.
14 वर्षाखालील बालकांना मजुरी वा कोणत्याही कामाला लावणे हा कायद्यानुसार गुन्हा असून याविरोधात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
12 वर्षाखालील मुलांना शेती वा बागकाम करण्यास भाग पाडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
16 वर्षाखालील मुलांना धोकादायक कामे करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मुलांना शाळेत शिक्षणाची गोडी लावावी व मजुरी करण्यास लागू.नये म्हणून मध्यान्न् भोजन योजने सारख्या योजना राबवण्यात येतात.
कामगार विभागामार्फत विशेष मोहिमा राबवून व धाडी टाकून वेळोवेळी उद्योग व कारखान्यांमध्ये बालकामगार आहेत किंवा कसेहे पाहण्यासाठी प्रयत्न केले जातात.यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी खटले भरण्यात येतात.
समाजिक प्रयत्न गरजेचे:- बालमजुरी प्रथा थांबवण्यासाठीफक्त शासन स्तरावरप्रयत्न करून चालणार नाही तरसामाजिक बांधिलकी म्हणूननागरिकांकडून काही प्रयत्न होणे गरजेचे आहे.
एखादे ठिकाणी बालकामगार काम करत असल्याचेआढळून आल्यास पोलिसांना त्याबाबत खबर द्यावी.
कोणत्याही परिस्थितीत पालकांनी मुलांना शिक्षणापासून दूर ठेवून बालमजुरी करण्यास भाग पाडू नये.
अनाथ अथवा बेवारस स्थितीत कोणी बालक आढळल्यास 1098 ह्या tolfree क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी.
सर्व शासकीय निमशासकीय अथवाअशा शासकीय संस्थांनी संघटनांनी बालमजुरी रोखण्यासाठी कृतिशील प्रयत्न करावेत.
अशाप्रकारे आपण सर्वजण मिळून समाजातील बालमजुरी सारखी अन्यायकारक व नंदनीयय प्रथा संपुष्टात आणू शकतो.
बालमजुरी वरील हा लेख आपणास आवडल्यास नक्की शेअर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा