वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
खतांचा हा नवीन प्रकार आपण पाहिलात का?
शेतीमध्ये सध्या वेगवेगळ्याच्या बियाण्याचे वाण व त्यासोबत पेरावयाच्या खतांची निवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने चांगल्यात चांगले बियाणे व खत निवडण्यावर शेतकरी भर देत आहेत.दरवर्षी खताचे दर आणि त्यांची उपलब्धता यात स्थिरता नसते.त्यामुळे योग्य खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना धावा धाव करावी लागते.आता शेतकऱ्याना पारंपरिक व रासायनिक.खतांबरोबरंच नॅनो खत हा नवोन प्रकार उपलब्ध होत आहे.तर चला पाहूया हा नवा प्रकार आणी त्याबद्दलची माहिती.
नॅनो युरिया:
पारंपरिक पद्धतीत 70 टक्के युरिया पिकांपर्यंत न पोहोचता अतिपाण्यामुळे जमिनीत मुरून बसतो किंवा हवेत उडून जातो. थोडक्यात वाया जायचा. ज्यामुळे जमीन ऍसिडीक बनते. जलस्रोत प्रदूषित होतात. जमिनीतील युरियाच्या वापराला आळा घालण्यासाठी संशोधकांनी द्रव रूपातील नॅनो युरिया विकसित केले आहे. नॅनो युरिया ड्रोनच्या माध्यमातूनही पिकांवर फवारता येणार आहे. पिकांवर फवारण्यासाठी एक लीटर पाण्यात 2-4 मिलीलिटर नॅनो युरिया मिसळावे लागते.असे आहेत नॅनो लिक्विड युरियाचे फायदे.:-
1. द्रव रूपातील नॅनो युरिया हे पिकांच्या पोषणासाठी प्रभावी आणि कार्यक्षम आहे, जे सुधारित पोषण गुणवत्तेसह उत्पादन वाढवते .
2. नॅनो. नॅनो युरिया लिक्विडच्या वापरामुळे पर्यावरण, पाणी आणि मातीचे प्रदूषण होणार नाही.
3.नॅनो युरिया बाटली स्वरूपात मिळणार असल्याने खतांच्या साठवणुकीसाठी लागणारे गोदाम, वाहतूक आदींच्या खर्चात बचत होऊ शकते.
4. नॅनो युरियाची अर्धा लिटरची बाटली साधारण 240 रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजे पारंपरिक युरियाच्या दहा टक्के किमतीला शेतकऱ्यांना मिळणार आहे.युरियावरील खर्च कमी झाल्याने तसेच पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल.
5. येत्या काळात देशभरात असे आणखी 8 प्रकल्प उभारण्यात येणार. चालू आर्थिक वर्षात पाच कोटी बाटल्यांचे उत्पादन करण्याचे लक्ष्य.(Iffco)
नॅनो डीएपी NANO DAP :-
इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह (IFFCO) ने अलीकडेच नॅनो डीएपी हे क्रांतिकारी उत्पादन लाँच केले आहे, जे पीक पोषणामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे वचन देते. हे नाविन्यपूर्ण उपाय सर्व पिकांसाठी नायट्रोजन (N) आणि फॉस्फरस (P) चे कार्यक्षम स्त्रोत प्रदान करते, उभ्या पिकांच्या वाढीच्या सर्व कमतरता दूर करण्यास मदत करते आणि उच्च गुणवत्तेसह उत्पादन वाढवते.
नॅनो डीएपी हे लिक्विड फॉर्मेशन आहे.ज्यात आठ टक्के नायट्रोजन आणि 16 टक्के फॉस्फरस आहे.इतर खतांच्या तुलनेत नॅनो डीएपीचे कणण आकाराने लहानअसून १०० नॅनो मीटर पेक्षा कमी असतात त्यांची कार्य करण्याची अनोखी पद्धतअसून 100 नॅनो मीटर पेक्षा कमी असतात त्यांची कार्य करण्याची त्यालाकणांना बियाच्या पृष्ठभागाच्या आत रंध किंवा वनस्पतीच्या उत्सर्जनातून सहज प्रविणेकणांना बियाच्या पृष्ठभागाच्या आत छिद्र किंवा वनस्पतीच्या उत्सर्जनातून सहजपणे प्रवेश करण्यास सक्षम करते .ज्ञानू डीएपी मधील नायट्रोजन आणि फॉस्फोरसचे क्लस्टर असतात जे बायोपोलिमर्स आणि इतर एक्स्पिरियन्टस सह कार्यान्वित केले जातात.
नॅनो डीएपी कसे वापरावे:- नॅनो डीएपी ची फवारणी प्रामुख्याने तृणधान्य कडधान्य भाजीपाला फळे फुले व औषधी वनस्पती पिकावर करता येते.नॅनो डीएपी ची फवारणीची शिफारस केलेली वेळआणि डोसबियाण्यांचा आकार वजन आणि पिकांच्या प्रकाराप्रमाणे बदलते.याचा वापर बीज प्रक्रिया मूळ आणि कंद उपचारतसेच पानांवर फवारणीसाठी केला जातो.नॅनो डीएपी बीज उपचारासाठी प्रति किलो 3 ते 5 एम.एल.आणि फवारणीसाठी 2 ते 4 एम.एल.प्रति लिटर प्रमाणे वापरण्याची शिफारस केली जाते.नॅनो डीएपीच्या पिकांवर दोन वेळा फवारणी ची शिफारस केली जाते त्यामध्ये फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आणि फुलधारण्याच्या अगोदर च्या अवस्थेचा समावेश होतो.
नॅनो डीएपी वापराचे फायदे:-
1.डीएपी हे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी केलेले डीएपी हे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असणारे खत आहे.मात्र याची उपलब्धता कमी असल्याने सर्व शेतकऱ्यांना ते मिळेलच याची खात्री नाही.मात्र नॅनो डीएपी हे लिक्विड फॉर्ममध्येे असल्याने याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाऊ शकते त्यामुळे ते सर्वांना उपलब्धही होऊ शकते.
2.डीएपी खताची किंमत नॅनो डीएपी लिक्विड खताच्या तुलनेत खूप जास्त आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.ज्ञानू डीएपी खताची एक लिटरची 1 बॉटल केवळ 600 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
3.नॅनो डीएपी हे खत द्रवरूप आणि कमी प्रमाणात लागणारे खत असल्याने हे खत साठवणे वाहतूक करणे हे खूप सोपे असून त्यासाठी लागणारा खर्चही कमी होणार आहे.
4.हे खत फवारणीच्या व बीज प्रक्रियेच्या माध्यमातून वापरले जाणार असल्याने वापराची प्रक्रिया खूप सुलभ होणार आहे.
अशाप्रकारे नवीन संशोधित ,लिक्विड नॅनो स्वरूपातील खते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाली असून त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार यात शंका नाही.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
खतं होणार स्वस्त ; रासायनिक खतांवर अनुदान जाहीर .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा