मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

बालमजुरी;एक अभिशाप

 बालमजुरी ;जगाला लागलेला एक अभिशाप आहे. आपण आज कितीही प्रगती केली असली ,आपण चंद्रावर पोचलो असलो आणि लवकरच  मंगळावर ही आपली पाऊले पडतील . पण आजही आपण पोटाच्या खळगी भरण्यासाठी राबराब  राबणाऱ्या  चीमुकल्याना  त्यांच्या हक्काच  मोफत अन्न ,वस्त्र ,आणि निवारा देऊ शकत  नाही ही शोकांतिका आहे. बालमजुरी ही कुणा  एका देशाची समस्या नाही तर ही संपूर्ण जगाची व्यथा आहे. जगातील प्रगत राष्ट्रांपासून ते गरीब  देशांमध्येही  ही समस्या गंभीर बनली आहे. बाल मजुरी म्हणजे काय :- बालमजुरी म्हणजे लहान बालकांना त्यांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेऊन त्यांना कामाला लावणे व .त्यांच्या वेतनाच्या मोबदल्यात शारीरिक व मानसिक क्षमतेपेक्षा जास्तीची श्रमाची कामे करायला लावणे. कायद्यानुसार वयाच्या 14 वर्षे पेक्षा लहान बालकांना कोणत्याही प्रकारचे श्रम व कामे करण्यास भाग पाडणे म्हणजे बालमजुरी होय. बालमजुरीची कारणे:-  बालमजुरीसाठी सर्वात मोठे कारण म्हणजेे गरिबी होय.गरिबीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कुटुंबप्रमुख व सदस्यांना जड जात असते उपलब्ध साधने अपुरी पडतात त्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी बालकांना मजुरी करण्यास

अखेर आतिक चा आतंक संपला !

त्याने जे पेरलं होतंं तेच उगवलं! चाळीस वर्षांची हुकूमत,१०० गुन्हेगारी प्रकरण,दीडशे गुंडांची टोळी,अरबो रुपयांची संपत्ती,जो साक्षात मृत्यूच दुसर नाव होता तोच मागच्या काही दिवसापासून मृत्यूच्या भीतीने थरथर कापत होता आणि आपल्याला उत्तर प्रदेशात पाठवू नये अशी न्यायालयासमोर विनवणी करत होता;तो अखेर मृत्यू च्या पाशात अडकलाच. 

 अतिक अहमद; उत्तरप्रदेश चा कुख्यात माफिया डॉन काल तीन शस्त्रधारी माथेफिरूच्या हल्ल्यात त्याचा भाऊ आश्रफ अहमद सह मारला गेला.पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अतिक व आश्रफ ला पोलिसांनी त्याला नियमित तपासणी साठी प्रयागराज येथील  रुग्णालयात नेले होते . मीडियाला प्रतिक्रिया देत असताना पत्रकारांच्या वेषात आलेल्या तीन सशस्त्र तरुणांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला.ही सर्व घटना मीडियाच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली आहे.

या हल्लेखोरांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत दोघे ठार झाले होते.अचानक झालेल्या या हल्ल्याने पोलीस देखील पुरते भांबवून गेले होते.हल्लेखोरांना तात्काळ अटक केली गेली.महत्वाची गोष्ट म्हणजे हल्लेखोरांनी पोलिसाना जरासाही प्रतिकार न करता आत्मसमर्पण केले.या हल्लेखोरांची नावे लवलेश, सन्नी आणि अरुण अशी असल्याचे सांगण्यात येत आहे.मुख्य म्हणजे दोन दिवसांपूर्वीच अतिक याचा मुलगा असद हा मेरठ जवळ एका पोलीस चकमकीत मारला गेला आहे. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले असून राजकीय व सामाजिक जीवन ढवळून निघाले आहे. या घटने बद्दल समाजाच्या सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.प्रदेशातील सर्व विरोधी पक्षांनी या घटनेची निंदा करून उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था आबादीत  नसल्याची टीका केली आहे.गुन्हेगारांना शासन करण्याची न्यायव्यवस्था असताना अशाप्रकारे न्याय केला जाऊ शकत नाही अशा प्रतिक्रिया उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहेत.तर शासनाकडून सदर घटनेची चौकशी करण्याकरिता उच्चस्तरीयसमिती नेमण्यात आली आहे. 

माफिया अतिक चा इतिहास:एक टांगेवाल्याच्या घरी जन्माला आलेल्या अतिक अहमद ने दहावी नापास झाल्यानंतरमी दहावी नापास झाल्यानंतरलवकर श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले.90 च्या दशकामध्ये उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्ष आपापल्या राजकीय महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार होत्या आणि त्या वेळच्या गुंड आणि माफीया लोकांनाही पोलिसांचा ससेमिरा आणि एन्काऊंटर मधून वाचण्यासाठी या राजकीय लोकांच्या आश्रयाची गरज होती . यामधून एक नवीन समीकरण जन्माला आले.आणि राजकारणातील गुन्हेगारीकरण व गुन्हेगारीतील राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाले.1983 साली अतिक अहमद वर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.1989 मध्ये त्याने तत्कालीन परिस्थितीचा फायदा घेत सांप्रदायिक कार्ड खेळत अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून लढवली आणि निवडून देखील आला.या निवडणुकीत त्याच्या विरोधात त्याच्यासारखाच गुन्हेगारीपार्श्वभूमी असणारा चांद बाबा उभा होता मात्र त्याचा पराभव झाला.निवडणुकी नंतर निकाला आधीच आतिक ने चांद बाबाचा एका दुकानावर भर दिवसा गोळ्या घालून खून केला.या घटनेने त्याचा दबदबा आणखीनच वाढला. त्यानंतर तो सन 1991, 1993, 1996 और 2002 मध्येही निवडून येत राहिला.सन 2000 मध्ये आपना दल या पक्षाचा तो प्रदेश अध्यक्ष बनला.मात्र  2004 मध्ये तो परत समाजवादी पार्टीमध्ये आला. फुलपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेला.हाच मतदार संघ पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मतदार संघ होता.

 राजु पाल हत्याकांडामुळे सुरु झाली उतरण: 2024 मध्ये लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्याने विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.त्या जागेवर त्याने आपला.भाऊ आश्रफ याला तिकिट मिळवून दिले.मात्र या  निवडणुकीमध्ये त्याचा भाऊ आश्रफ बहुजन समाजवादी चा उमेदवार राजु पाल याच्याकडून पराभूत झाला.राजु पाल हा देखील गुन्हेगारी वृत्तीचा होता.राजु पाल निवडून आल्यानंतर त्याच्यावर बरेच वेळा जीव घेणे हल्ले झाले मात्र यातून तो वाचला मग तो 25 जानेवारी 2005 रोजी शहरातील धुमनगंज भागामध्ये राजपाल यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करून त्याची  हत्या करण्यात आली.2007 सालि  झालेल्या निवडणुकीत याच जागेवर आश्रफ समाजवादी पार्टी च्या मदतीने निवडून आला मात्र यानंतर पुढील प्रत्येक निवडणुकीत आश्रफ आणि आतिक यांना पराभवाचा सामना करावा लागला. अतिक 2009,2014,2018 चा उपचुनाव आणि 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांचे विरोधातात लढलेली लोकसभा निवडणूक असा सलग पराभव पत्करावा लागला.दरम्यानच्या काळात अधिक ने आपल्या टोळीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील 14 जिल्ह्यांमध्ये माफिया राज पसरवून अवैध कब्जा, खंडणी,सुपारी किलिंग,अपहरण अशा माध्यमातून अरबो रुपयांची संपत्ती जमा केली.अधिक वेगवेगळ्या प्रकरणात जेलमध्ये असताना अतिकची पत्नी शाजीया परवीन सर्व कारभार पहायची हळूहळू अतिक ची मुले देखील यामध्ये सामील झाली.अलीकडेच आतिक साबरमती जेलमध्ये यामधून राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याची हत्या भर दिवसा त्याच्या घरात घुसून केली गेली.या हत्याकांडातुन आतिक ने त्याचा तिसऱ्या नंबरचा मुलगा असद याला गुन्हेगारी जगतामध्ये लॉन्च केले.

     अतिक अहमद चा मुलगा असद अहमद
 हा गुन्हा असद याचा पहिला आणि अखेरचा गुन्हा ठरला. फरार असलेला असद मेरत मध्ये एका साथीदारासह पोलिसांसोबत या0 चकमकीत मारला गेला.आणि आता आतिक आणि अश्रफ यांना हल्लेखोरानीं गोळ्या घालून ठार केले. नियतीने घेतलेला हा बदला असल्याचा व अनेक निष्पाप लोकांचा अतिक व गॅंगने केलेल्या छळाबद्दल लोकांच्या श्रापांचा हा परिणाम असल्याचे लोक बोलत आहेत आज अतिक आणी आश्रफ चे मरण त्याने पेरलेल्या गुन्हेगारी च्या बिजानेच ओढवले.हल्लेखोरांनी त्यांना लोकप्रिय व मोठे माफिया होण्यासाठी हे हत्याकांड केल्याचे सांगितले आहे. आज अतिक ची तीन मुले जेल.मध्ये पत्नी फरार एक भाऊ व मुलगा त्याच्या सोबत स्वर्गवासी झाला.आणखी एक भाऊ जेलमध्ये आहे जे जिवंत आहेत त्यांना मरणाची व कायद्याची भीती सतावत आहे.यालाच म्हणतात 'पेराल तेच उगवते'.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट